पॉक्सो :गुड टच - बॅड टच मधील बॅड टच पासून वाचविणारा मुला-मुलींसाठी महत्वाचा कायदा. ॲड. रोहित एरंडे

 गुड टच - बॅड टच मधील बॅड टच पासून वाचविणारा मुला-मुलींसाठी महत्वाचा कायदा म्हणजे पॉक्सो : 

मुलांनो आणि मुलींनो.. खूप महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. बऱ्याचदा तुम्हाला असे जाणवेल कि एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श म्हणजेच टच तुम्हाला जरा वेगळा वाटतो किंवा तुम्हाला अस्वस्थता येते, असे वाटते कि काहीतरी चुकीचे होतेय, पण सांगता येत नाही. असा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला केलेला   आवडला नाही तर त्याला बॅड टच म्हटले जाते. म्हणजेच एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला (शू -शी ची जागा) हळूच हट्ट लावायचा प्रयत्न करीत असेल किंवा तुमचं छातीला हात लावायचा प्रयत्न करत असेल,  तर त्याला ही बॅड टच बोलले जाते. पण एखादी  व्यक्ती  तुम्हाला प्रेमाने स्पर्श करत असेल, किंवा डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असेल  तर त्याला गुड टच मानले जाते. उदा. आपली आई जेव्हा आपल्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आपल्याला समजते कि हा गुड टच आहे. 

पण जर का कोणीही तुम्हाला बॅड टच करत असेल, तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या प्रायव्हेट पार्टस ला हात लावायचा प्रयत्न करीत असेल, किंवा पापी घ्यायचा प्रयत्न करत असेल किंवा काहीतरी चॉकलेट -आईस्क्रीम देतो, एखादे खेळणे देतो  असे सांगून तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टसला हात लावायला सांगत असेल, किंवा घाणेरडे फोटो किंवा पिक्चर किंवा व्हिडिओ दाखविण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेचच नाही म्हणा आणि त्या व्यक्तीपासून आधी दूर जा आणि असा प्रकार आपल्या जवळच्या व्यक्तीच्या कानावर घाला. कारण असे घाणेरडे प्रकार हे आपल्याकडे गुन्हा समजले जाते आणि अश्या . 

अश्या आणि इतर लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायदा आपल्याकडे करण्यात आला आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(२) नुसार, बालहक्क संरक्षणाची हमी देण्यात आलेली आहे. तसेच  संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क जाहीरनाम्यावर भारताने ११ डिसेंबर १९९२ रोजी स्वाक्षरी केली आहे.  या कायद्यामध्ये बालकाची व्याख्या हि व्यापक म्हणजेच मोठी करण्यात आली असून त्यामध्ये  अठरा वर्षाच्या आतील कोणतीही व्यक्ती त्यामध्ये पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी यांचा समावेश होतो.

पिडीत बालकाचे/बालिकेचे नाव उघड केले जात नाही.

काय आहे हा कायदा ?

पॉक्सो कायद्यामध्ये लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, अश्लील कारणांसाठी बालकांचा  वापर करणे आणि बालकांना  अश्लील किंवा लैंगिक अश्लील सामग्री दाखविणे  यासह अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.


कायद्याची ठळक वैशिष्ट्ये ?

.१.  ह्या कायद्याखाली तक्रार केलेल्या व्यक्तीचें आव उघड केले जाते नाही. त्यामुळे असे काही प्रकार तुमच्या बाबतीत घडले किंवा तुमच्या मित्र मैत्रिणीबाबत असे घडले तर लगेचच तक्रार करा. 

२. तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिस  साध्या वेशात येतात आणि  शक्यतो महिला पोलिस अधिकारी हे निवेदन नोंदवून घेतात.

३. कोर्टात  फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

४. न्यायालयात खटला दाखल केल्यावर ‘इन कॅमेरा’ साक्ष नोंदवली जाते. म्हणजे जज, वकील आणि फिर्यादी एवढेच लोक असतात. इतर कोणालाही त्यावेळी कोर्टरूम मध्ये  प्रवेश मिळत नाही. 

५. कोणत्याही कारणासाठी कोणत्याही बालकाला रात्री पोलिस ठाण्यात थांबवून घेतले जात नाही.

६.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिडीत बालकाची वैद्यकीय तपासणी पालकांच्या किंवा बालकाचा विश्वास असलेल्या मोठ्या व्यक्तीच्या  उपस्थितीत केली जाते आणि जर पिडीत व्यक्ती मुलगी  असेल तर स्त्री डॉक्टरांकडूनच तिची वैद्यकीय तपासणी केली जाते.



पालकांसाठी महत्वाचे :

*मुले खूप साधी भोळी असतात. त्यांचा पटकन कोणावरही विश्वास बसतो. लहान मुलांना विशेषतः ३-५ वर्षांच्या मुलांना गुड टच आणि बँड टच बद्दल जरूर सांगा. 

* मुलांचे  कपडे शक्यतो दार लावून बदलावेत. अनोळखी व्यक्तीसमोर तर मुळीच कपडे बदलू नका

* मुलांना सांगा , त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला म्हणजेच शू-शी च्या  जागेला  त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करु शकत नाही, मग ते आपले नातेवाईक असतो का मित्र मैत्रिणी. अर्थात जर डॉक्टरांकडे आपण गेलो आणि आई-वडील असताना डॉक्टरांनी तपासणी करताना असा स्पर्श केला तर चालू शकते. 

मुलांना हे सुद्धा सांगा जर डॉक्टर त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत टच करत असतील तर तो गुड टच आहे.

नातेवाईक ही तुमच्या प्रायव्हेट पार्टसला हात लावू शकत नाही

*सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांवर विश्वास ठेवा. त्यांनी जर अश्या बॅड टच बद्दल सांगितले तर त्याच्याकडे गांभीर्याने बघा. बऱ्याचदा असे प्रकार ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. ह्याचा अर्थ सगळ्या व्यक्ती तश्याच असतात असे अजिबात नाही. तरीही काळजी घेणे उत्तम. मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटेल असे नाते निर्माण करा. 

Comments

Popular posts from this blog

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य - "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे ©

प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क कोणते ? ॲड. रोहित एरंडे ©

मूलभूत हक्क पाहिजेत, मग मूलभूत कर्तव्यांची पण माहिती हवीच !!