Posts

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य - "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे ©

  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य  -  "जनी वावगे बोलता सुख नाही" ऍड. रोहित एरंडे © आपल्यापैकी बहुतेकजण हे , व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारखे  कुठलातरी  सोशल मिडिया वापरात असतो.  आपण बघितले असेल कि सोशल मिडिया हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा वापर कसा करायचा हे ज्याच्यात्याच्या मनोवृत्तीवर ठरते. मात्र हल्ली ह्या माध्यमांवर खूप वेळा दुसऱ्या व्यक्तींबद्दल वेडे वाकडे लिहिले - बोलले जाते. आपल्याला राज्यघटनेने बोलण्याचे -अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे ह्याचा अर्थ आप वाटेल ते बोलायचे असे होत नाही. स्वातंत्र्य हे मंगेश पाडगावकर म्हणतात तसे "तुमचे आमचे सेम" असले पाहिजे.  असते".  आपल्याला पाहिजे तेव्हा स्वातंत्र्य आणि त्याचवेळी ते दुसऱ्याला नाही, असे "सोयीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य" करता येत नाही.     सोशल मिडिया हा आता जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे आणि ह्या  मिडीयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच ऐरणीवर आलेले असते आणि प्रदर्शन करायला काही धरबंधच उरत नाही. एकतर स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवनातील चांगल्या वाईट घटना "अपडेट" ...

पॉक्सो :गुड टच - बॅड टच मधील बॅड टच पासून वाचविणारा मुला-मुलींसाठी महत्वाचा कायदा. ॲड. रोहित एरंडे

 गुड टच - बॅड टच मधील बॅड टच पासून वाचविणारा मुला-मुलींसाठी महत्वाचा कायदा म्हणजे पॉक्सो :  मुलांनो आणि मुलींनो.. खूप महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. बऱ्याचदा तुम्हाला असे जाणवेल कि एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श म्हणजेच टच तुम्हाला जरा वेगळा वाटतो किंवा तुम्हाला अस्वस्थता येते, असे वाटते कि काहीतरी चुकीचे होतेय, पण सांगता येत नाही. असा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला केलेला   आवडला नाही तर त्याला बॅड टच म्हटले जाते. म्हणजेच एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला (शू -शी ची जागा) हळूच हट्ट लावायचा प्रयत्न करीत असेल किंवा तुमचं छातीला हात लावायचा प्रयत्न करत असेल,  तर त्याला ही बॅड टच बोलले जाते. पण एखादी  व्यक्ती  तुम्हाला प्रेमाने स्पर्श करत असेल, किंवा डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असेल  तर त्याला गुड टच मानले जाते. उदा. आपली आई जेव्हा आपल्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आपल्याला समजते कि हा गुड टच आहे.  पण जर का कोणीही तुम्हाला बॅड टच करत असेल, तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या प्रायव्हेट पार्टस ला हात लावायचा प्रयत्न करीत असेल, किंवा पापी घ्...

पोलीस कारवाई आणि आपले कायदेशीर हक्क. ॲड. रोहित एरंडे ©

पोलीस कारवाई आणि आपले कायदेशीर हक्क.  पोलीस यंत्रणा हि समाजातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची प्रमुख यंत्रणा आहे. पण पोलीस हा सभाड म्हटला तरी एक भितीची भावना आपल्या मनात तरळून जाते. तर पोलीस कारवाई करतात म्हणजे काय ? त्यांना काय अधिकार असतात आणि आरोपीला काय अधिकार असतात हे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू.  गुन्हा म्हणजे काय ? फौजदारी कायद्याचे उल्लंघन करणे किंवा एखादे वर्तन हे समाज स्वास्थ्याच्या विरुध्द असेल तर तो गुन्हा असे सोप्या शब्दात म्हणता येईल आणि अश्या गुन्ह्याला शिक्षा मिळते  आणि असा गुन्हा करणाऱ्याला गुन्हेगार असे म्हणतात. म्हणतात अनैतिकता /पाप करणे आणि गुन्हा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत दिलेला शब्द न पाळणे किंवा एखाद्याने केलेले उपकर विसरणे हे अनैतिक म्हणता येईल, पण गुन्हा नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट एखाद्या प्रदेशात गुन्हा असेल पण दुसऱ्या भागात असेलच असे नाही. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे वेगवेगळे कायदे आहेत. उदा. नेवाडा (लास वेगास) राज्यामधेय मोठाले कॅसिनो उभारण्यास परवानगी आहे, तर इतर बहुतांशी राज्यांमध्ये नाही तर  न्यू जर्सी राज्यामध्ये तुम...
आपला प्यारा तिरंगा झेंडा फडकविताना काय काळजी घ्यावी ? "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा" हे गाणे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच. दरवर्षी तुम्ही सर्व जण २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ह्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शाळेत जाता . बरोबर ह्या दिवशी वाटेत तुम्हाला ठिकठिकाणी झेंडे (ध्वज)विकायला ठेवलेले दिसत असतील. अश्या ह्या आपल्या झेंड्या संदर्भात काही महत्वाचे नियम आहेत ते आपल्याला माहित हवेत. आपल्या राज्य घटनेत जी काही नागरिकांची कर्तव्ये दिली आहेत त्यातील एक प्रमुख कर्तव्य म्हणजे राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे हे होय.  आणि आपल्या तिरंग्याचा आपल्याकडून चुकून अपमान तर होत नाही ना, ह्या करिता  नियम आणि कायदे माहिती असणे गरजेचे आहे, त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे. .  १. आपल्या राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी राष्ट्रीय ध्वज फडकविणे आणि अयोग्य वापराचा प्रतिबंध कायदा, १९५० तसेच  भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971 ह्या कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत.  २. रंग आणि आकार : आपला राष्ट्रध्वज तिरंगी आयताकृती अ...

मूलभूत हक्क पाहिजेत, मग मूलभूत कर्तव्यांची पण माहिती हवीच !!

मूलभूत हक्क पाहिजेत, मग मूलभूत कर्तव्यांची पण माहिती हवीच !! आपल्या सर्वांना हक्क, अधिकार हवे असतात आणि हि एक नैसर्गिक मानवी भावना आहे. 'मी म्हणेल तसेच इतरांनी वागावे" म्हणजेच काय तर एकाचा अधिकार हा दुसऱ्याचे कर्तव्य होऊ शकते. ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा तुम्हा मुलांचा हक्क आहे, मग तुमचे कर्तव्य काय तर नीट अभ्यास करणे, आपल्या शिक्षकांचे ऐकणे.. आपण राज्यघटनेतील मूलभूत  अधिकार काय हे बघितले, त्याचप्रमाणे आता कर्तव्ये काय ह्याचीही माहिती घेऊ.  आपल्या राज्यघटनेत (संविधान)अनुच्छेद ५१-अ (५१-A ) मूलभूत कर्तव्ये हा एकूण १० कर्तव्ये विशद करणारा विभाग १९७६ साली केलेल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून जोडला गेला. ही दुरुस्ती ३ जानेवारी १९७७ पासून अमलात आली. त्यामुळे तेव्हापासून दरवर्षी  ३ जानेवारी दिवस हा 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिन' म्हणून पाळला जातो. तदनंतर २००२ साली केलेल्या ८६व्या घटनादुरुस्तीनंतर ह्या कर्तव्यांचा यादीत  11 वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. आता आपण  हि ११ कर्तव्ये कोणती ह्याची यादी बघू.  १. भारतीय संविधानाचे पालन क...

प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क कोणते ? ॲड. रोहित एरंडे ©

 प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क कोणते ? ॲड. रोहित एरंडे ©  तुम्हाला माहित आहेच कि मोठा स्वातंत्र्य लढा दिल्यानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. आपल्या देशाचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून प्रत्येक देशाची एक घटना म्हणजेच नियम असतात, जे सगळ्यांनी पाळले पाहिजेत.   भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षेतेखाली घटना समिती नेमली गेली आणि त्यांच्या अथक परिश्रमाने आणि २ वर्षे चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आपली राज्य  घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अस्तित्वात आली आणि तिचा अंमल २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाला.  अश्या ह्या राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकास काही मूलभूत अधिकार दिले आहेत त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. ह्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व कोर्टांवर आहे.  १) समानतेचे  हक्क : कायद्यासमोर सर्व समान  (अनुच्छेद  १४ ते १८) –  - प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असते आणि  सर्वांना कायद्याचे समान संरक्षण आहे.  - भारतीय नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण, या व अशा कोणत्...